दोन पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड
By Admin | Updated: May 30, 2014 00:37 IST2014-05-29T23:40:54+5:302014-05-30T00:37:49+5:30
शेगाव पोलिस कोठडीत आरोपीला मारहाण प्रकरणात दोन पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड

दोन पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड
शेगाव: पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने पैशाची मागणी पूर्ण न केल्याने आरो पीला मारहाण करून जखमी करणार्या शेगाव पो.स्टे.चे पो.कॉ. गजानन गिते व धोंडगे हे न्यायालयात दोषी सिद्ध झाल्याने शेगाव न्यायालयाने दोघांना प्रत्येकी १,५00 रुपये दंड ठोठावला. एका चोरी प्रकरणात गोपालखेड, जि. अकोला येथील आरोपी रामदास जाधव याला ३१ जुलै २0१३ रोजी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीमध्ये आरोपीला पो.कॉ. गजानन गिते व धोंडगे नामक पोलिस कर्मचार्यांनी पैशाची मागणी केली.आरोपीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघा पोलिसांनी आरोपीला जबर मारहाण केली. याबाबत आरोपीने शेगाव न्यायालयात १ ऑगस्ट रोजी तक्रार दिल्यानंतर आरो पीचा वैद्यकीय अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी गजानन गिते व धोंडगे यांच्याविरुद्ध प्रकरण क्रमांक ५९/१४ कलम ३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्याने दोघांना प्रत्येकी १,५00 रुपये दंड सुनावला यापैकी २00 रुपये आरोपी रामदास जाधव याला, तर ५00-५00 प्रत्येकी सरकार जमा करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी श्रीमती काळे यांनी दिला आहे.