बीबी परिसरात वाढले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:36+5:302021-09-26T04:37:36+5:30

बीबी ग्रामीण रुग्णालय सध्या हाउसफुल्ल झाले असून येथील रक्त तपासणी करण्याचे यंत्र बंद आहे. बीबी परिसरात डेंग्यू, ताप, खोकला ...

Patients grown in the BB area | बीबी परिसरात वाढले रुग्ण

बीबी परिसरात वाढले रुग्ण

बीबी ग्रामीण रुग्णालय सध्या हाउसफुल्ल झाले असून येथील रक्त तपासणी करण्याचे यंत्र बंद आहे.

बीबी परिसरात डेंग्यू, ताप, खोकला आजार वाढले आहेत. अधिक रुग्ण संख्या असलेल्या बीबी रुग्णालयात प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणीचे यंत्र लिक्विडअभावी बंद असल्यामुळे गोरगरीब जनतेला खासगी लॅबमधून तपासणी करावी लागत आहे. गोरगरीब जनतेला नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. बीबी ग्रामीण रुग्णालयाचे रक्त तपासणी यंत्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी रुग्ण करीत आहेत.

प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावीन

ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी करण्याचे यंत्र सुरू करण्यासाठी दोन-तीन दिवसांत लिक्विड येईल. सर्वांनी पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील पदार्थ व शिळे अन्न खाऊ नये. घराच्या परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शहा यांनी केले आहे.

Web Title: Patients grown in the BB area