निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:14 PM2020-01-31T14:14:43+5:302020-01-31T14:14:49+5:30

एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.

Patients are getting the support of the nourishment nutrition plan | निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

निक्षय पोषण योजनेचा क्षय रुग्णांना मिळतोय आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पूरक पोषण आहारही रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल २०१८ पासून ही योजना कार्यान्वीत केली असून जिल्ह्यातील साडेचार हजार क्षयरुग्ण या योजनेचा लाभ घेत आहेत.
जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास १६० संशयीत रुग्ण आढळत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. मधल्या काळात जिल्ह्यात १२६ क्षय रुग्ण एका सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आले होते. त्यांच्यावरही उपचार करण्यात ेत आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांशवेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती आजाराला बळी पडतो. मधल्या काळात सुमारे ३००० संशयीत रुग्ण आढळून आले होते. त्यांचे थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणीअंती १२६ क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे समोर आले होते. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल २०१८ पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने या योजनेतंर्गत नियमित उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीत यात ५०० रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येत आहे. आदीवासी भागाकरीता हा भत्ता ७५० रुपये असल्याची माहिती डॉ. मिलींद जाधव यांनी दिली. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात दोन हजार ८०० क्षयरुग्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पुरक पोषण आहारासाठी हा भत्ता देण्यात येतो. त्यातून पोषमयुक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण असून, नियमित स्वरुपात उपचार सुरू रहावे अशी भूमिका यामागे आरोग्य विभागाची असल्याचे समोर येत आहे.


जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार
क्षय रोग हा ‘मायकोबॅक्टेरिमय च्युबरक्युलोसिस’ नावाच्या जिवाणूमळे होणारा संसर्गजन्य असा रोग आहे. प्रामुख्याने फुफ्पुस व इतर कोणत्याही अवयवाचा तो असू शकतो. हाडे, सांधे, मज्जातंतूचा क्षय रोग होऊ शकतो. वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सायंकाळी येणारा लाक्षणिक ताप ही या आजाराची लक्षणे असू शकतात.


७८ टक्के रुग्णांनी घेतला लाभ
एप्रिल २०१८ पासून सुरू झालेल्या या योजनेतंर्गत आतापर्यंत चार हजार ४२४ उपचार घेणाºया क्षय रुग्णांनी या या पुरक पोषण आहार भत्ता योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी या रुग्णांना ६९ लाख ५८ हजार ५०० रुपयांचे देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Patients are getting the support of the nourishment nutrition plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.