The path to development of Sindkhed raja is now open! | मातृतिर्थाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा !
मातृतिर्थाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा !


लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांचे माहेरघर असल्याने त्यांच्या जन्मस्थळाचा विकास झाला पाहीजे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कागदी घोडे नाचविली. परंतू मागील पाच वर्षाच्या काळात खऱ्या अर्थाने या नगरीच्या विकासाला चालना मिळाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जागतिक स्थळाचा दर्जा देऊ या विधानाने सिंदखेडराजा नगरीच्या विकासाला चालना मिळाल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या नावाखाली अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली. एवढेच नाही तर बेंबीच्या देठाला पिळ पडेपर्यंत फक्त भाषणातून विकासाच्या भुलथापा मारल्या. अद्ययावत वास्तू संग्रालय उभे राहीले तर नगरीच्या विकासाला चालनासुध्दा मिळेल. विश्वातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी अनेकांनी मागणी केली. त्या मागणीची अखेर दिल्लीकरांना दखल घ्यावी लागली, हेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. मातृतिर्थाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता जागतिक स्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी खरी कसरत खासदार प्रतापराव जाधव यांना करावी लागणार आहे.
 
अमित शाह यांच्या घोषणेने आशा पल्लवीत

आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येत्या २१ आॅक्टोबरला मतदान होणार असून २४ आॅक्टोबरला निकालही जाहीर होणार आहेत. यामुळे आगामी लोकप्रतिनिधीकडून नागरिकांना विकासाच्या अपेक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मातृतिर्थाच्या विकासाचा मुद्दा सातत्याने समोर येत होता. मात्र कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय होत नसल्याने अद्यापही खºया अर्थाने विकास झाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेने या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. मातृतिर्थाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुलडाणा जिल्ह्यातील पहीलीच भेट ही जिल्ह्याच्या सकारात्मक कायार्साठी फलदायी ठरली. जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळाला जागतिक स्थळाचा दर्जा देऊ या विधानाने निश्चितच विकासाला चालना मिळेल .
- राजेंद्र आढाव
संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य

सिंदखेडराजा शहराची ओळख ही जिजाऊंच्या नावामुळे जगात झाली आहे. या जन्मस्थळाच्या विकासाला आता खºया अर्थाने चालना मिळणार आहे.
- देवीदास ठाकरे ,
माजी नगराध्यक्ष, सिंदखेडराजा

राष्ट्रमाता माँ जिजाऊ आमची अस्मीता आहेत. त्यांचा इतिहास जिवंत राहावा, येणाºया पिढीसाठी तो प्रेरणादायी ठरावा यासाठी वाटेल ते सहकार्य आपण करु.
- तोताराम कायंदे
- माजी आमदार, सिंदखेडराजा

Web Title: The path to development of Sindkhed raja is now open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.