माझी वसुंधरा अभियानात साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:37+5:302021-08-28T04:38:37+5:30

भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ग्रामपंचायत स्तरावर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतींची ...

Participation of Sakharkheda Gram Panchayat in my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सहभाग

माझी वसुंधरा अभियानात साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सहभाग

भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ग्रामपंचायत स्तरावर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. साखरखेर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच दाऊत कुरेशी, सचिव प्रकाश आढाव यांनी या पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी कार्य केले. पर्यावरण व वातावरण बदल या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर यांनी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा अभियान या योजनेत सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. कार्याची दखल घेऊन सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले आहे. भविष्यात या कार्यात सहभागी होऊन गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष जतन करून पर्यावरण संतुलन ठेवावे, असाही संदेश दिला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे प्रमाणपत्र दिले आहे.

Web Title: Participation of Sakharkheda Gram Panchayat in my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.