आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:34 PM2019-03-29T17:34:00+5:302019-03-29T17:34:20+5:30

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे.

Parents' rush to fill the RTE application | आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

आरटीईचे अर्ज भरण्यासाठी पालकांची धावाधाव;  उरला एकच दिवस

Next

बुलडाणा: जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रेवश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतमी मुदत ३० मार्च आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी पालकांच्या हातात शेवटचा एकच दिवस उरला आहे. विविध कागदपत्र वेळेवर न मिळाल्याने अर्ज भरण्यासाठी पालकांची सध्या धावाधाव होत आहे. 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखिव ठेवण्याची तरतूद आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीतील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ५ मार्चपासून २३ मार्चपर्यंत पलाकांना आॅनलाईन अर्ज करण्याकरीता मुदत देण्यात आली होती. मात्र अर्ज भरण्यास अनेक अडचणी आल्याने काही पालक मुदतीमध्ये अर्ज करू शकले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या  कालावधीत ३० मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला आहे. परंतू आतापर्यंत पालकांना लागणारे विविध कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. निवडणूकांच्या तोंडावर कागदपत्र मिळविणे पालकांसाठी अवघड झालेले आहे. त्यामुळे काही पालकांचे अर्ज भरणे बाकी आहे. 
 
निवडणुकीच्या कामामुळे अडकले आवश्यक कागदपत्र
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी रहिवासाचा वास्तवाचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग अयल्यास तसे प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला यासारखे विविध कागदपत्र आवश्यक आहेत. मात्र हे कागदपत्र मिळविण्यासाठी पालकांची दमछाक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी व्यस्त असल्याने सर्वसामान्यांना लागणारी कागदपत्र ते देण्यासाठी चालढकल करताना दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांचे आवश्यक कागदपत्र केवळ निवडणुकीच्या कामामुळे अडकले आहेत. परिणामी ते आपल्या पाल्याचा अर्जही भरू शकले नाही.

संकेतस्थळ ‘हँग’
आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत जवळ आल्याने अनेक पालक सध्या अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर आहेत. अर्ज वाढल्याने संबंधीत संकेतस्थळच ‘हँग’ होत आहे. इंटरनेट सेवा अगदी संथगतीने चालत असल्याने एक अर्जासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे काही पालक रात्रीच्या वेळेतही अर्ज भरत आहेत.

Web Title: Parents' rush to fill the RTE application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.