पाल्य दिसताच पालकांना गहिवर!

By Admin | Updated: December 6, 2015 02:30 IST2015-12-06T02:30:34+5:302015-12-06T02:30:34+5:30

चेन्नईत अडकलेले सेन्ट अँन्सचे विद्यार्थी सुखरुप पोहोचले; शिक्षकांची समयसूचकतेमुळे बचावले.

Parents look patronized! | पाल्य दिसताच पालकांना गहिवर!

पाल्य दिसताच पालकांना गहिवर!

खामगाव : निसर्ग सौंदर्याची भरमार असलेल्या केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्या खामगावातील सेन्ट अँन्स स्कूलचे विद्यार्थी चेन्नईतील ढगफुटीत शिक्षकांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे संकटापासून थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी खामगावात शाळेची ही सहल परत आल्यानंतर सहलीसोबत गेलेल्या शिक्षीका सुजाता उबाळे यांनी घडलेला प्रकार कथन केला. तेव्हा समय सुचकतेने घेतलेला निर्णय उपयुक्त ठरल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चेन्नईत पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच केरळची ट्रीप आटोपून सेन्ट अँन्स स्कूलचे सह तामिळनाडूतील तिरूवेल्लरमध्ये पोहोचल्या. खरेतर चेन्नईतून त्यांना परतीच्या प्रवासासाठी ट्रेन पकडायची होती. मात्र चेन्नईतील पावसाच्या रुद्रावताराची माहिती त्यांना स्थानिकांनी दिली. आणि खामगाव व अकोला येथील विद्यार्थ्यांंच्या सहलीसोबत असलेल्या जवळपास दहा शिक्षकांनी तिरुवेल्लूर येथेच थांबण्याची समयसुचकता दाखवली. त्यामुळे चेन्नईत पावसाच्या रुद्रावताराने पोहोचवलेल्या छळी पासून ते थोडक्यात बचावले. सेन्ट अँन्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ग्यानसुंदरी, सुजाता उबाळे, सिस्टर अकिला, मिसेस फातीमा यावेळी मुलांसोबतच होत्या. खामगाव येथील २९ व अकोला येथील ४२ विद्यार्थ्यांंसह एकूण दहा शिक्षकांचा यात समावेश होता.

Web Title: Parents look patronized!