एप्रिल-मे महिन्यात पंचायत राज समिती बुलडाण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST2021-04-17T04:35:11+5:302021-04-17T04:35:11+5:30

दरम्यान, ही समिती २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेला भेट ...

The Panchayat Raj Committee will be convened in April-May | एप्रिल-मे महिन्यात पंचायत राज समिती बुलडाण्यात येणार

एप्रिल-मे महिन्यात पंचायत राज समिती बुलडाण्यात येणार

दरम्यान, ही समिती २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व तर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष एप्रिल-मे महिन्यादरम्यान घेणार आहे. त्यामुळे संबंधित वर्षाच्या अहवालांच्या किमान पाच प्रती जिल्हा परिषद प्रशासनास तयार ठेवाव्या लागणार आहे.

-- समितीवर कोरोना संसर्गाचे सावट--

प्राथमिक स्वरुपातील पंचायत राज समितीचा हा दौरा जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. मात्र, कोरोनाची साथ आणि तिचा होत असलेला प्रसार ही बाब विचारात घेऊन आ. डॉ. संजय रायमुलकर हे समिती प्रमुख असलेल्या या पंचायत राज समितीचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनास अहवाल व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे.

Web Title: The Panchayat Raj Committee will be convened in April-May