शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शेगावच्या गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 12:10 PM

श्रीगजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ०८ जून रोजी सकाळी ७.३० वाजता प्रस्थान झाले.

शेगाव: येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रीचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ०८ जून रोजी सकाळी ७.३० वाजता प्रस्थान झाले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी श्रींचे पूजन केले.संपुर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूरला बहुतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन संस्थानचे १९६८ पासून श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर याठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे.आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षीसोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. व आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृद्धिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रसाद पडण्यास मदत होते. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत.या गावामध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रद्धा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून, ही पालखी पाहताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतो.श्रींच्या पालखीचा प्रवासश्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्ष आहे. शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७५० किमी आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे, असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे.ठिकठिकाणी स्वागतश्रींचे पालखीचे स्वागताकरीता गावातील भजनी मंडळी, बँडपथक, तुलसी वृंदावनासह ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या व पुष्प वर्षाव केला जातो. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकाकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.प्रवासात असणा-या सोयीश्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारक-यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापानी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. स्नानाकरीता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परीने वारकरी मंडळींची सेवार्थ व्यवस्था करतात.वाटेत भेटणा-या वारकरी दिंड्यांची सेवा श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीकरीता इतर भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाऱ्या दिंड्यातील पुरूष, महिला, मुले-मुली इत्यादी वारकऱ्यांना संस्थानकडून कपडे वितरीत करण्यात येतात. तसेच प्रत्येक पंढरीच्या मार्गावर भेटणाºया दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते.असा राहील पालखीचा मार्ग८ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव मार्गे १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.परतीचा मार्गपंढरपूर येथे १० ते १५ जुलैपर्यंत मुक्काम राहून कुडवाळी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे ५ ऑगस्ट रोजी मुक्काम व ६ ऑगस्ट रोजी शेगावकडे प्रस्थान करून श्रींचा पालखी सोहळा शेगावात दाखल होईल