स्व-स्वरूप संप्रदायाचा पादुका मिरवणूक सोहळा

By अनिल गवई | Updated: December 29, 2023 12:02 IST2023-12-29T12:01:11+5:302023-12-29T12:02:08+5:30

खामगाव: स्व- स्वरूप सप्रंदाय उत्तर बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने शुक्रवारी सकाळी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून पादुका दर्शन मिरवणूक काढण्यात ...

Paduka Procession Ceremony of Swavarup Sampradaya | स्व-स्वरूप संप्रदायाचा पादुका मिरवणूक सोहळा

स्व-स्वरूप संप्रदायाचा पादुका मिरवणूक सोहळा

खामगाव: स्व- स्वरूप सप्रंदाय उत्तर बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने शुक्रवारी सकाळी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून पादुका दर्शन मिरवणूक काढण्यात आली.

शहरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या या मिरवणुकीचे भाविकांच्यावतीने ठिकठिकाणी स्वागत झाले. सकाळी ११ वाजता बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून निघालेल्या मिरवणुकीने नटराज गार्डन, अग्रसेन चौक, मुख्य रस्ता मार्गे शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण केले. या मिरवणुकीच्या अग्रभागी स्व- स्वरूप संप्रदायाच्या ध्वज आणि कलशधारी महिला होत्या. त्यांच्या पाठीमागे पादुका असलेला मुख्य रथ मिरवणुकीचा केंद्र बिंदू ठरला. या मिरवणुकीत स्व स्वरूप संप्रदायाचे अनुकाने मोठ्यासंख्येने सहभागी झाले. अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील भाविक महिलांची मिरवणुकीत मोठी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरणही सामाजिक संस्थांकडून करण्यात आले.

Web Title: Paduka Procession Ceremony of Swavarup Sampradaya