मालकपूरजवळ कत्तलीसाठी गोवंश नेणारा अ‍ॅपे पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:18 AM2017-12-13T10:18:30+5:302017-12-13T10:23:21+5:30

मलकापूर (बुलढाणा) : मालवाहू अ‍ॅपे गाडीतून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला अ‍ॅपे सोमवारी रात्री पोलिसांनी पकडला.

Owner caught cows carrying Apte near killer! | मालकपूरजवळ कत्तलीसाठी गोवंश नेणारा अ‍ॅपे पकडला!

मालकपूरजवळ कत्तलीसाठी गोवंश नेणारा अ‍ॅपे पकडला!

Next
ठळक मुद्देअ‍ॅपे चालक व मालकाविरूध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलअश्या घटनांसंदर्भात नागरिकांनी माहिती देण्याचे पोलिसांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर (बुलढाणा) : मालवाहू अ‍ॅपे गाडीतून कत्तलीसाठी घेऊन जात असलेला अ‍ॅपे ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पकडला. याप्रकरणी अ‍ॅपे चालक व मालकाविरूध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएच१९बीएम- २९१९ या अ‍ॅपे गाडीत सात गोवंश कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या आधारे पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने बुलडाणा रोड स्थित वानखेडे पेट्रोल पंपाजवळ सदर अ‍ॅपे पकडून चालक चंद्रकांत उत्तम पाटील (वय २५) रा. निमखेड ता. बोदवड व मालक शे.आबीद शे.बिस्मील्ला कुरेशी (वय २४) रा. बोदवड या दोघास ताब्यात घेतले व सदर गाडीतील जनावरांना बेलाडस्थित श्रीहरी गो शाळेत सुरक्षितरीत्या पोहचविले.
याप्रकरणी पोलीस नाईक महेश चोपडे यांच्या तक्रारीवरुन प्राणी संरक्षण कायदा व प्राणी छळ प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय लव्हंगळे करीत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेवून जात असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Owner caught cows carrying Apte near killer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.