जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:31+5:302021-07-12T04:22:31+5:30
--या रुग्णांना होता धोका-- मधुमेह, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, ल्युकेमिया, दीर्घकाळ स्टेरॉइडचा वापर करणारे आणि योग्य पोषण आहार न ...

जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात
--या रुग्णांना होता धोका--
मधुमेह, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, ल्युकेमिया, दीर्घकाळ स्टेरॉइडचा वापर करणारे आणि योग्य पोषण आहार न मिळालेल्यांना हा बुरशीजन्य आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. सोबतच बुरशीजन्य आजारामुळे नाक, डोळा, दात व जबड्याला या आजारामुळे त्रास होता. सोबतच नाकातील पोकळ हाडावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. त्यामुळे डोके दुखणे, डोळ्यावर सूज येणे, नाकात दाह होणे, दात दुखणे अशा प्रकारची या आजाराची लक्षणे होती.
--
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात घट झाली आहे. वर्तमान स्थितीत यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात एकही रुग्ण नाही. असे असले तरी नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज आहे.
(डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा)
---म्युकरमायकोसिसचे रुग्ण--
एकूण रुग्ण:- ६३
दवाखान्यात दाखल झालेले:- ६३
उपचारानंतर बरे झालेले:- ५८
मृत्यू पावलेले:- ५
सध्या उपचार घेत असलेले:- ०
--दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण--
एकूण:- ६१,११०
कोरोना मृत्यू:- ४१३