शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST2021-02-16T04:35:29+5:302021-02-16T04:35:29+5:30

शिवजयंतीच्या अनुषंगाने सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी येथील मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, ...

Organizing various programs on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवजयंतीच्या अनुषंगाने सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी येथील मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, सचिव अनिल कस्तुरी, भगवान शिंदे उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाची सुरुवात १६ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी नगरपालिका सभागृहात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जीवनचरित्र हा विषय देण्यात आलेला आहे. सायंकाळी ६ वाजता गीतांजली झेंडे यांचे शिवचरित्र व आजची पिढी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गांधी भवनात होणार आहे. या उत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, मनीषा पवार, आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थित होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, दीपक देवा यांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Organizing various programs on the occasion of Shiva Jayanti