अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश

By Admin | Updated: September 19, 2014 23:06 IST2014-09-19T23:06:50+5:302014-09-19T23:06:50+5:30

लोणार येथे ११ हजाराची दारू जप्त : निवडणूक काळात खबरदारी घेण्याचे आदेश.

Order to destroy illegal ammunition | अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश

अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश

बुलडाणा : निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी विविध उपया योजना प्रशासनाने हाती घेतल्या आहेत. या पृष्ठभुमिवर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री तसेच हातभट्टीची दारू निर्मिती करणारे अड्डे उद्धवस्त करा असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्या वरून जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतले आहे. दरम्याने लोणार येथील गवळीपूरा भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ११ हजार ५४0 रुपयाची हातभट्टीची दारू पकडली. मेहकर येथील दुय्यम निरिक्षक आर.बी. राठोड यांच्या पथकाने लोणार शहरातील गवळी पुरा भागात प्यारीबाई बुद्धु नौरंगाबादी व चाँदबी खैरू तुंडीवाले यांच्या घरावर छापा टाकून ४५0 लिटर मोह सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आणि ३३ लिटर हातभट्टीची दारू असा ११ हजार ५४0 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Order to destroy illegal ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.