शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : Unpredictable पाकिस्तान! अमेरिकेकडून हरणाऱ्या शेजाऱ्यांनी टीम इंडियाला स्वस्तात All Out केले
2
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
3
आठवल्यांचा 'प्रतिक' ओमानचं क्रिकेट गाजवतोय... नाशिकच्या पोराकडून स्कॉटलंडची धुलाई
4
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
5
लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
7
वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!
8
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
9
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
10
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
11
PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी
12
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
13
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
14
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
15
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
16
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
17
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
18
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
19
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
20
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान

सरकारविरूद्ध काँग्रेसची खामगावात निदर्शने    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:56 AM

खामगाव: भाजपाच्या सत्ता स्थापनेला ३१ ऑक्टोबर २0१७ रोजी ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ३0 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. 

ठळक मुद्देएसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना फवारणी पंपाची दिली भेट!माजी आमदार सानंदासह ६0 आंदोलकांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजपाच्या सत्ता स्थापनेला ३१ ऑक्टोबर २0१७ रोजी ३ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ३0 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. सन २0१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत खोटी आश्‍वासने देऊन व जनतेची दिशाभूल करून भाजपाने राज्याची सत्ता हस्तगत केली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतरदेखील भाजपा सरकारने केवळ घोषणांचाच पाऊस पाडला असून, अंमलबजावणी न केल्यामुळे जनतेचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. तर यावेळी विषारी औषधाच्या फवारणीने २१ शेतकर्‍यांचा नाहक बळी गेल्यामुळे कृषिमंत्री फुंडकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत माजी आमदार सानंदा यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना फवारणी पंपाची भेट देऊन भाजपा सरकारचा निषेध केला.    याप्रसंगी  कृउबास सभापती संतोष टाले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, शहराध्यक्ष प्रवीण कदम, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, कृउबासचे माजी सभापती राजाराम काळणे, संचालक विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, शेगाव ता.कॉ. कमेटीचे अध्यक्ष अशोक हिंगणे, रहीम खा दुल्हे खा, विजय काटोले, ज्ञानेश्‍वर शेजोळे, नगरसेवक इब्राहीम खा सुभान खा, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, शेख फारुख बिसमिल्ला, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, महिला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुरजितकौर सलुजा, तालुकाध्यक्ष भारती पाटील, न.प. काँग्रेस पक्षनेत्या अर्चना टाले, भारती इंगळे, सुजाता गायकवाड, प्रमिला चोपडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मो. वसिमोद्दीन, तालुकाध्यक्ष शफीउल्ला खा, शहर अध्यक्ष बबलू पठान, शेख जुल्कर शेख चाँद, माजी नगरसेवक शेख नईम शेख मेहबुब, पं.स. सदस्य इनायत उल्ला खा, विठ्ठल सोनटक्के, माजी जि.प. सदस्य सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण धोटे, माजी पं.स. उपसभापती चैतन्य पाटील, गोपाल सातव, युवक काँग्रेस ब्रिगेडचे तुषार चंदेल यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, काँग्रेसच्या विविध सेलचे सदस्य यांच्यासह शेतकरी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते. 

माजी आमदार सानंदासह ६0 आंदोलकांवर गुन्हे दाखलखामगाव: गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदीचे उल्लंघन केल्याने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाजार समिती सभापती संतोष ताले यांच्यासह काँग्रेस नगरसेवक व ५0 ते ६0 कार्यकर्त्यांंवर सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती; मात्र बसस्थानकाकडून ग्रामीण पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर परवानगी नसताना माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस पदाधिकार्‍यांनी बसस्थानकाजवळ खड्डा नामकरण करून ‘पिता पुत्र गौरव तलाव नामकरण सोहळा’ असे बोर्ड लावत, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी नापोका गजानन सातव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाजार समिती सभापती संतोष ताले, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने, काँग्रेस शहराध्यक्ष नगरसेवक प्रवीण कदम, नगर परिषद गटनेत्या अर्चना ताले, नगरसेवक भूषण शिंदे, शेख नईम, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तुषार चंदेल यांच्यासह इतर ५0 ते ६0 जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :agitationआंदोलन