‘सौर कृषी पंप’ योजनेतून उत्पन्न वाढीची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 02:19 PM2020-03-07T14:19:37+5:302020-03-07T14:19:44+5:30

सध्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील २३१० शेतकरी अटक कृषी पंप योजनेचा लाभ घेत आहेत.

Opportunity to increase income from 'Solar Agricultural Pump' scheme! | ‘सौर कृषी पंप’ योजनेतून उत्पन्न वाढीची संधी!

‘सौर कृषी पंप’ योजनेतून उत्पन्न वाढीची संधी!

googlenewsNext

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सौर कृषी पंपासाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून रहावे लागणार नसून सौर उर्जेद्वारे शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील २३१० शेतकरी अटक कृषी पंप योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी महाआघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे शेतकºयांकडून स्वागत होत आहे.
ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकºयांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकºयाना अटल सौर कृषीपंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य दिल्याने परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवगार्तील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवगार्तील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरायची होती. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी अकोला परिमंडळाअंतर्गत असणाºया अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे.
त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१३ आणि दुसऱ्या टप्यातील ३७ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली आहे . त्यापैकी पहिल्या टप्यातील ४०९ आणि दुसऱ्या टप्यातील ५०३ शेतकºयांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहे, तर वाशिम जिल्हयातील ज्या शेतकºयांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली होती त्यापैकी पहिल्या टप्यात १४२१ आणि दुसºया आणि तिसºया टप्यात ३२५ अशी परिमंडळातील एकून ३३८० शेतकºयांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.


‘अटल कृषी पंप’चा २३१० ग्राहकांनी घेतला लाभ
यापूर्वी राबविण्यात आलेल्या अटल सौर कृषीपंप योजनेत परिमंडळाअंतर्गत असणाऱ्या अकोला जिल्हयात ५७७, बुलढाणा ८४१ आणि वाशिम जिल्हयात ८९२ सौर कृषीपंप असे परिमंडळातील तीनही जिल्हयात एकून २३१० सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत.

Web Title: Opportunity to increase income from 'Solar Agricultural Pump' scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.