टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:54 IST2020-07-15T11:54:17+5:302020-07-15T11:54:51+5:30

मंगळवारी सायंकाळी ही घटना खामगाव-शेगाव रोडवर घडली.

One man killed in tipper accident | टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : भरधाव टिप्परच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना खामगाव-शेगाव रोडवर घडली.
शेगाव तालुक्यातील टाकळी हाट येथील रघुनाथ जगन्नाथ रावणकार (३५) एमएच २८ क्यू- ८०१९ या दुचाकीने घरी जात होते. त्याचवेळी चिंचोली फाट्यानजीक एमएच २८ एबी ८२७१ च्या टिप्पर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जबर धडक दिली.
यात ३५ वर्षीय दुचाकी स्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी स्वाराच्या पार्थिवाचे जागीच दोन तुकडे झाले. घटनेनंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. पुढील कारवाई शेगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Web Title: One man killed in tipper accident