एक लाख रुपयाचा अवैध गुटखा जप्त

By Admin | Updated: August 19, 2014 23:18 IST2014-08-19T22:36:02+5:302014-08-19T23:18:13+5:30

१ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला

One lakh rupees of illegal gutkha seized | एक लाख रुपयाचा अवैध गुटखा जप्त

एक लाख रुपयाचा अवैध गुटखा जप्त

मेहकर : सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथून १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून, १९ ऑगस्ट रोजी गुटखा विक्रेत्याविरुद्ध साखरखेर्डा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील अमडापूर येथील शे.लाल शे.शब्बीर (३५) हा एम.एच.१९ क्यू. ६४४ क्रमांकाच्या वाहनातून अवैध गुटख्याच्या ४८ पोत्याची वाहतूक करीत होता. सोमवारला रात्री ८.३0 वाजता अवैध गुटक्याची वाहतूक करीत असतांना शे.लाल शे.शब्बीर याला साखरखेर्डा येथे अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी बुलडाणा येथील अन्नसुरक्षा अधिकारी डॉ.राम दत्तात्रय मुंढे यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शे.लाल शे.शब्बीर याच्याविरुद्ध कलम ३२८, २७३, १८८ भादंवि आर.डब्ल्यू. कलम ५९ असुमानदेका २00६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अशोक लांडे करीत आहेत. 

Web Title: One lakh rupees of illegal gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.