अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: August 13, 2015 00:19 IST2015-08-13T00:19:57+5:302015-08-13T00:19:57+5:30

बुलडाणा तालुक्यातील घटना.

One killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

बुलडाणा : जवळच असलेल्या भादोला शिवारात बोरखेडकडे जात असलेल्या एका व्यक्तीच्या मोटारसायकलीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. मोताळा तालुक्यातील कापूसवाडी येथील गणेश रमेश ब्राम्हंदे वय ३२ हे मोटारसायकल क्रमांक एमएच १९ बीव्ही ९0६५ ने दुपारी बोरखेड या आपल्या सासुरवाडीकडे जाण्याकरिता रवाना झाले. दरम्यान, भोदाला शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलीस धडक देऊन फरार झाला. या अपघातात गणेश ब्राम्हणदेचा जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी परिसरातील काही व्यक्तींनी मृत गणेश यांच्या मोटारसायकलीस आयशर गाडीने धडक दिल्याची माहिती दिली आहे.

Web Title: One killed in an unknown vehicle