देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:36 AM2020-06-08T10:36:50+5:302020-06-08T10:40:17+5:30

भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला.

One killed in a two-wheeler accident in Deulgaon Raja | देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार

देऊळगाव राजात दुचाकी अपघातात एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देघटना शनिवारी सायंकाळी शहरातून जाणाऱ्या चिखली मार्गावरील एका हॉस्पीटल समोर घडली. एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जालना येथे हलविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा: भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी शहरातून जाणाऱ्या चिखली मार्गावरील एका हॉस्पीटल समोर घडली. या अपघातातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जालना येथे हलविण्यात आले आहे.
शनिवारी रात्री तीन युवक दुचाकीवर औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. शहरातून जाणाºया चिखली मार्गावर असलेल्या शहरातील एका हॉस्पीटल समोर वेगात जाणारी ही दुचाकी नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली. अपघातानंतर नागरिकांनी तिघा युवकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीवर दोन मित्रांच्यामध्ये बसलेला नीलेश प्रमोद हाके (२२, रा. संभाजीनगर, चिखली) हा युवक डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. मनोज फुलचंद कठाळे (२२, रा.अंचरवाडी) व गणेश बबन देशमुख (२२, रा.चिखली) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघातातील या तीनही तरुणांवर डॉ. योगेश कायंदे, डॉ. पवन डोईफोडे, डॉ. सांगळे यांनी तातडीने उपचार केले. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी सकाळी मृतक नीलेश हाके या युवकाच्या मृतदेहाचे देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चिखली येथे रविवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: One killed in a two-wheeler accident in Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.