कार अपघातात एक ठार, दोन गंभीर
By Admin | Updated: August 18, 2014 23:45 IST2014-08-18T23:09:48+5:302014-08-18T23:45:28+5:30
नांदेडहून मेहकर मार्गे बुलडाणाकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव वेगातील कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला धडकली.

कार अपघातात एक ठार, दोन गंभीर
चिखली : नांदेडहून मेहकर मार्गे बुलडाणाकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव वेगातील कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला धडकली. या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटानजिक सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. चुमुमोरी चलपतीराव व जान्हवी डांगे हे १८ ऑगस्ट रोजी नांदेड येथून बुलडाणाकडे कार क्रमांक एम.एच.१२ ई.टी.६१८ ने जात असताना चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटानजिक सकाळी साडेनऊच्या सुमारास कारचालक वसंत पडघाने यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली. या अपघातात कारचालक वसंता पडघाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चुमुमोरी चलपतीराव व जान्हवी डांगे गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी कारचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले व उपचारार्थ रूग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतकास स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पीएसआय भोई करीत आहेत.