दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 12:01 IST2021-03-21T11:52:59+5:302021-03-21T12:01:07+5:30
One killed, two injured in Accident अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून एक ठार, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रमः रस्त्यात पंक्चर झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मेहकर-चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा गावानजीक शनिवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडला. घडला. अपघातामधील मृत महिला ही बुलडाणा शहरातील द्वारकानगरमधील रहिवाशी आहे.
या अपघातामध्ये सुनीता विठ्ठल राऊत (४०) या महिलेचा मृत्यू झाला असूनन्जय विठ्ठल राऊत (२१) आणि मेहकर शहरातील पवनसूत नगरमधील सौरभ एकनाथ वाघ (१७) हे दोघे जखमी झाले आहेत. संबंधीत तिघेही मेहकर येथील नातेवाईकांना भेटून बुलडाण्याकडे एमएच-२८-एक्यू ३०३४ क्रमांकाच्या दुचाकीद्वारे परत येत होते. दरम्यान मेहकर-चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा असताना रोडवर उभ्या असलेल्या ट्रक्टर ट्रालीवर आदळल्याने एका महीलेचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना मेहकर चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा गावानजीक रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर (एमए-२८ एजे- ७९२२) आदळली. त्यात सुनीता राऊत यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताचा पुढाल तपास साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले होते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती. ट्रॅक्टर ट्रॉली पंक्टर झाल्यामुळे रस्तावरच उभी होती.