मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, दाेन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST2021-05-09T04:36:42+5:302021-05-09T04:36:42+5:30

या अपघातामध्ये अनिल अशोक ताकतोड (रा. मेहकर) याचा मृत्यू झाला असून त्याचे सहकारी अक्षय संजू मानकर आणि आकाश गजानन ...

One killed, two injured in cargo collision | मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, दाेन जखमी

मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, दाेन जखमी

या अपघातामध्ये अनिल अशोक ताकतोड (रा. मेहकर) याचा मृत्यू झाला असून त्याचे सहकारी अक्षय संजू मानकर आणि आकाश गजानन साबळे (रा. मेहकर) हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपरोक्त तिघेजण हे दुचाकी (क्रमांक एमएच-४२-एपी-१३०३) द्वारे उमरा देशमुख येथे गवंडी कामासाठी जात होते. दरम्यान, शहापूरनजीक एका पांढऱ्या रंगाच्या मालवाहू पिकअपला अेाव्हरटेक करत असताना पिकअपची दुचाकीला मागील बाजूने धडक बसली. त्यामध्ये अनिल अशोक ताकतोड याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. समृद्धी महामार्गालगत शहापूर शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात पांढऱ्या रंगाच्या मालवाहू पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नरोटे हे करीत आहेत.

Web Title: One killed, two injured in cargo collision