ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 16:04 IST2020-06-28T16:03:53+5:302020-06-28T16:04:06+5:30
प्रदीप राधाकिसन कुधळे(३८ वर्ष) रा. टेंभुर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना या इसमाचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
राहेरी बु : सिदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु जवळ राहेरी जांभोरा रोडवर ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक गंभीर स्वरुपात जखमी झाला. ही घटना आज दि.२८ जून रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडली.प्रदीप राधाकिसन कुधळे(३८ वर्ष) रा. टेंभुर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर विजय जमदाडे (३५वर्ष रा.टेंभुर्णी ता.जाफ्रबाद )हा गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. जखमीला पुढील उपचारासाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहे. हे दोघे मिस्त्री काम करतात ते कामानिमित्त टेंभुर्णी येथुन जांभोरा येथे जात असताना जांभोऱ्या कडुन येणारा ट्रक क्रमांक MH 17 BD 8070 व राहेरी बु कडुन येणारी बजाज प्लाॅटीना यामध्ये हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच किनगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास बिट जमादार चव्हाण साहेब व गजानन सानप हे करीत आहेत.