भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना
By अनिल गवई | Updated: October 15, 2022 16:35 IST2022-10-15T16:34:57+5:302022-10-15T16:35:55+5:30
कामावरून परततान घडली घटना.

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक ठार, खामगाव-अकोला रोडवरील घटना
खामगाव: भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी १२:३० वाजता ही घटना खामगाव-अकोला रोडवर घडली.
सुनिल भिकाजी आटोळे (५३, रा. बाळापूर फैल) असे मृतक इसमाचे नाव आहे. बाळापूर रोडवरील एका कार सजावट साहित्याच्या दुकानावर वॉचमन म्हणून कर्तव्य बजावत असलेले आटोळे शनिवारी दुपारी १२:३० वाजता जेवण आटोपून कामावर परतत होते. त्याचवेळी भरधाव मालवाहू वाहनाने त्यांना चिरडले. या घटनेनंतर भरधाव मालवाहू वाहन अकोलाच्या दिशेने निघून गेले.
या अपघातानंतर जखमी अवस्थेत सुनिल आटोळे यांना सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी आटोळे यांना मृत घोषित केले. घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सीसी फुटेजच्या आधारे पोलीस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत.