मेहकर-चिखली मार्गावर हार्वेस्टर-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:55 IST2018-03-05T00:55:44+5:302018-03-05T00:55:44+5:30
हिवरा आश्रम : मेहकर-चिखली मार्गावर देऊळगाव माळी गावानजीक हार्वेस्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

मेहकर-चिखली मार्गावर हार्वेस्टर-दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : मेहकर-चिखली मार्गावर देऊळगाव माळी गावानजीक हार्वेस्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, गहू काढण्यासाठी हार्वेस्टर हे देऊळगाव माळीच्या दिशेने जात होते. दरम्यान, मेहकरकडून येणारी दुचाकी (क्र. एमएच- २८-एआर-९१५४) आणि हार्वेस्टरमध्ये अपघात झाला. यात दुचाकीवरील पंजाबराव लंबे (४५) हे जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी कडूबा भाकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघेही दुचाकीवर माळखेड येथे जात होते. दरम्यान, देऊळगाव माळीनजीक हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठले व पार्थिव मेहकर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.