अमडापूर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 11:55 IST2021-04-28T11:55:00+5:302021-04-28T11:55:08+5:30

मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव अरुण निवृत्ती काकडे (३८, रा. बोरगाव काकडे) असे आहे.

One killed in collision with unidentified vehicle on Amdapur-Chikhali road | अमडापूर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अमडापूर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अमडापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना अमडापूर-चिखली मार्गावर करणखेड फाट्यानजीक २६ एप्रिल रोजी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव अरुण निवृत्ती काकडे (३८, रा. बोरगाव काकडे) असे आहे. अरुण काकडे हे दुचाकीवर (क्रमांक एमएच-२८-एक्स ७७२८) घराकडे परत येत होते. त्यावेळी चिखली-अमडापूर मार्गावर करणखेड फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. त्यात अरुण काकडे हे जागीच ठार झाले. याप्रकरणी सोमान श्रीकिसन काकडे (३२, रा. बोरगाव काकडे) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला  आहे. घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस ठाण्यातील दिलीप तोंडे हे करीत आहेत.

Web Title: One killed in collision with unidentified vehicle on Amdapur-Chikhali road