वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी. सोनबर्डी येथील घटना
By विवेक चांदुरकर | Updated: July 20, 2023 21:21 IST2023-07-20T21:21:03+5:302023-07-20T21:21:13+5:30
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना २९ जुलै ...

वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी. सोनबर्डी येथील घटना
जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना २९ जुलै रोजी दुपारी घडली.
सोनबर्डी येथील धरणा जवळ राहणारे दोघे तरुण धरणावर पाणी पाहायला गेले असता वीज पडल्याने ज्ञानेश्वर भारत यादव (वय २१ वर्षे) या तरूणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र आकाश तुकाराम जांभुळकर (वय २३ वर्षे) जखमी झाला आहे.
मृतकाचे वडील भारत यादव धरणावर गेले असता त्यांना दोघेही जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने दोघांनाही जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी ज्ञानेश्वर भारत यादव याला मृत घोषित केले. जखमी आकाश जांभुळकर याच्यावर जामोद येथे उपचार सुरू आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रंजना आवारे व पोलीस शिपाई रंजित व्यवहारे, स्वप्निल झुंझारकर, समाधान शिंगणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.