सात हजार रुपयांची लाच स्विकारताना आगार प्रमुखासह एकास अटक
By संदीप वानखेडे | Updated: August 22, 2023 13:38 IST2023-08-22T13:35:53+5:302023-08-22T13:38:07+5:30
बुलढाण्यात एसीबीचा सापळा : कारवाई न करण्यासाठी मागितली लाच.

सात हजार रुपयांची लाच स्विकारताना आगार प्रमुखासह एकास अटक
संदीप वानखडे, बुलढाणा : पंढरपूर यात्रेदरम्यान एसटी बसमध्ये स्टाेव्ह पेटवून स्वयंपाक केल्याचा व्हिडीओ व्हारयल झाल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना बुलढाणा आगारचे प्रमुख संताेष महादेव वानेरे यांच्यासह एका वाहकास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली़ ही कारवाई २१ ऑगस्ट राेजी रात्री बुलढाणा खामगाव रस्त्यावर करण्यात आली.
पंढरपूर यात्रेसाठी बुलढाणा आगारातून काही बस गेल्या हाेत्या़ यावेळी बसमध्यचे स्टाेव्ह पेटवून काही कर्मचारी स्वयंपाक करीत असल्याचा व्हिडीओ व्हारयल झाला हाेता़ या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी संताेष वानेरे यांनी तक्रारदार कर्मचाऱ्यास ४० हजार रुपयांची लाच मागितली हाेती़ तडजाेडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले हाेते़ त्यापैकी २८ हजार रुपये आराेपी वानेरे यांनी स्विकारली आहे़ तसेच उर्वरीत ७ हजार रुपये देण्यासाठी तगादा सुरू हाेती़ दरम्यान लाच द्यायची नसल्याने फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली हाेती़ एसीबीने या प्रकरणी खात्री केल्यानंतर २१ ऑगस्ट राेजी रात्री सापळा रचून सात हजार रुपयांची लाच घेतांना एसटी महामंडळाच्या बुलढाणा आगाराचे प्रमुख संताेष वानेरे आणि एसटी बसचे वाहक महादेव दगडू सावरकर यांना रंगेहाथ अटक केली़ ही कारवाई पाेलीस उपअधीक्षक शितल घोगरे, पो. नि. सचिन इंगळे, पोहेकॉ. मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी ना.पो.शि. विनोद लोखंडे , जगदीश पवार,रवींद्र दळवी, सुनील राऊत पोकॉ. गजानन गाल्डे,मपोकॉ स्वाती वाणी यांच्या पथकाने केली़