आता लक्ष केंद्र सरकारच्या घोषणेकडे
By Admin | Updated: March 18, 2015 23:45 IST2015-03-18T23:45:23+5:302015-03-18T23:45:23+5:30
बुलडाणा जिल्हा बँकेचे पुनरुज्जीवन; खरिपापर्यंंत बॅंक सुरू करण्याची मागणी.

आता लक्ष केंद्र सरकारच्या घोषणेकडे
बुलडाणा : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर तो परत मिळविण्यासोबतच बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मंगळवारी नाबार्डसोबत राज्य शासनाने करार केल्यामुळे मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे. आता सामंजस्य करार हा केंद्र सरकारकडे जाणार असल्याने तिकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. बुलडाणा, वर्धा व नागपूर या तीन जिल्हा बँकांचे परवाने रिझर्व्ह बँकेने रद्द करून व्यवहारांवर निर्बंंंध आणले. यामुळे या बँका अडचणीत आल्या असून, सर्व व्यवहार ठप्प आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात २३ जिल्हा बँकांना नाबार्डच्या माध्यमातून २३७५.४२ कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये या बँकांचाही समावेश असल्याने जिल्हा बँक पुनरुज्जीवनाची आशा पल्लवित झाली असून, नाबार्डसोबतचा करार हा केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.