राजकारण करण्याची ही वेळ नाही-रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:21+5:302021-04-24T04:35:21+5:30
ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला ...

राजकारण करण्याची ही वेळ नाही-रविकांत तुपकर
ते स्थानिक पत्रकार भवनमध्ये २३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते़ कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात वाढला आहे. ग्रामीण विभागात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. नागरी भागात आरटीपीसीआरचे रिपोर्ट वेळेवर मिळत नाहीत. व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हेच कळत नाही, मग त्याच्यावर उपचार कसे करावेत, हा प्रश्नही तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला. त्यातच तो पॉझिटिव्ह असेल तर विना औषधोपचाराचे चार ते पाच दिवस निघून जातात आणि प्रकृती गंभीर बनून रुग्ण दगावतो, अशी भयावह स्थिती आहे. शहराच्या ठिकाणी तपासणी करायला लोक घाबरतात. ग्रामीण भागात औषधोपचाराची सोय झाल्यास कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील मोठ्या गावांमध्ये शासनाने दिलेल्या निधीतून शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. कोरोनामुळे सर्वत्र भीषण परिस्थिती उद्भवली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत ऑक्जिसन मिळत नाही, म्हणून रुग्ण दगावत आहेत. आरटीपीसीआरसाठी स्वॅब दिल्यानंतर त्याचा रिपोर्टच सहा दिवसांनी येतो. अहवाल कळेपर्यंत रुग्णाची प्रकृती बिघडते. काय करावे, हे सामान्यांना सूचत नाही. संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने ४८ तासांत आरटीपीसीआरचा रिपोर्ट देण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात कठाेर पावले उचलण्याची गरज तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार
तहान लागल्यावर प्रशासन विहीर खोदत असल्याचा प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत. केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हेतर अख्ख्या राज्यात ग्रामीण भागामध्ये मोठ्या ग्रामपंचायतींनी कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये क्वारंटीन सेंटर करावे, पूर्वीचे बंद असलेले केंद्र सुरू करावे, आदी उपाय त्यांनी मांडले.