सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:38+5:302021-09-24T04:40:38+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाचा नवीन रुग्ण आढळला नाही़, तसेच गुरुवारी सहा ...

No new patients for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्ण नाही

सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्ण नाही

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाचा नवीन रुग्ण आढळला नाही़, तसेच गुरुवारी सहा रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ ८७५ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ जिल्ह्यात सध्या १२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत़

गुरुवारी जिल्हावासीयांना सहाव्यांदा नवीन संसर्गीत रुग्णाच्या शून्याने दिलासा दिला आहे; मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले १२ सक्रिय रुग्ण आहे. त्यामुळे मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनिटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रींचा अवलंब करावा, तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७ लाख १३ हजार ६३६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

८४८ नमुने घेतले निदानासाठी

आज रोजी ८४८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ५५० कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ८६५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच आजपर्यंत ६७३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: No new patients for the second day in a row