‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा!
By Admin | Updated: August 17, 2014 00:07 IST2014-08-16T23:24:29+5:302014-08-17T00:07:02+5:30
इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा!
बुलडाणा: इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
शिक्षणाचा मुलभूत अधिकार कायदा करून आपण शैक्षणीक क्षेत्रात नवी सुरवात केली आहे; मात्र या कायद्यातील इयत्ता आठवीपर्यंत परीक्षाच न घेण्याची तरतूद चुकीची वाटते. या निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. स्थानिक कला महाविद्यालय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
उप मुख्यंमंत्री पुढे म्हणाले, की आजची पिढी नव्या विचारांची व नव्या क्रांतीची आहे. या पिढीमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा व आव्हाने पेलण्याची जोरदार क्षमता असून, येणार्या काळात ह्यहायफाय पिढीह्ण नव्हे तर ह्यवायफाय पिढीह्णच समाजाचे भविष्य घडविणार आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या ज्ञानाची परीक्षा ही झालीच पाहिजे, असे आपले मत आहे.