पुरवठा विभागात दलालांना नो एन्ट्री

By Admin | Updated: September 19, 2014 23:02 IST2014-09-19T23:02:04+5:302014-09-19T23:02:04+5:30

लोकमतवृत्ताची दखल घेत शेगाव तहसीलदारांनी बजावले आदेश, मात्र पुरवठा विभाग झोपेतच.

No entry to brokers in the supply section | पुरवठा विभागात दलालांना नो एन्ट्री

पुरवठा विभागात दलालांना नो एन्ट्री

शेगाव : शेगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात दलालांच्या सहाय्याने राशनकार्डाची सर्रास विक्री होत असल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारी प्रकाशित करताच तहसीलदार डॉ. रामेर्श्‍वर पुरी यांनी दखल घेतली. पुरवठा विभागात कुठल्याही व्यक्तींना स्वत:च्या अर्जाशिवाय प्रवेश नसल्याचे आदेशच गुरूवारी १८ सप्टेंबर रोजी त्यांनी बजावले आहेत. या आदेशाची माहिती होऊनही पुरवठा विभागाने मात्र ते गांभिर्याने घेतले नसल्याचे चित्र आज शुक्रवारी पुन्हा दिसुन आले. शेगावच्या पुरवठा विभागात शेकडो नागरीकांनी नवीन राशनकार्ड बनविने विभक्त कुटूंबाचे राशनकार्ड बनविने, नाव कमीकरणे, नाव वाढविणे आदी कामांसाठी अर्ज दिलेले आहेत. एका महीन्यांच्या आत सदर अर्जावर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षीत असतांना दिड हजारांच्या वर अर्ज मागील दिड ते दोन वर्षापासून पुरवठा विभागात धुळ खात पडुन आहेत. एकीकडे कामे जास्त असल्याने अर्ज निकाली काढण्यास उशिर होत असल्याचा खुलासा पुरवठा विभाग देत आहे. मात्र दुसरीकडे जिर्ण अर्ज किंवा नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर तात्काळ कारवाई करीत दोन ते चार हजार रुपयांत राशन कार्ड उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

Web Title: No entry to brokers in the supply section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.