शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नववीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित!

By admin | Updated: July 5, 2017 19:27 IST

शिक्षण विभागाची उदासीनता: पालकांची धावपळ

किशोर मापारी / लोणार लोकमत न्यूज नेटवर्कइयत्ता नववीचा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात बदलला असून नवीन पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध नसल्याने पालकांची तारांबळ उडत आहे.तर दुसरीकडे पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे.शैक्षणिक सत्राला २७  जूनपासून प्रारंभ झाला असला तरी अद्याप बाजारात नवीन पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. पाठ्यपुस्तके मिळत नसल्याने पालकांची धावपळ होत आहे. बाजारपेठेत आवश्यक तो पाठ्यपुस्तकांचा साठा का उपलब्ध झाला नाही आणि तो उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाने काय प्रयत्न केले , असे प्रश्न पालकांतून उपस्थित केल्या जात आहेत. जीएसटी कर प्रणालीचा धसका घेतलेल्या विक्रेत्यांनी पाठ्यपुस्तके मागविली नाहीत कि पुस्तके उपलब्ध नाहीत या प्रश्नाची उत्तरे शिक्षण विभागाला देणे गरजेचे आहे. शाळा प्रवेश आणि पाठ्यपुस्तकांची खरेदी यामध्ये पालकवर्ग पिळवटून निघत आहे.परंतु या दोन्ही मुद्यावर शिक्षण विभागाकडून काहीही हालचाली होत नाहीत , अशी खंत व्यक्त होत आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले नाही. यावरून पुस्तकांच्या उपलब्धतेबाबत मंडळच उदासीन दिसून येत आहे. पुस्तकांची उपलब्धता नसण्यामागची कारणे काय , यासंदर्भात शिक्षण विभागाणे भूमिका स्पष्ट करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके उपलब्ध होतील , यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे.पाल्याची मागणी पूर्ण होत नसल्याची पालकांची खंतशैक्षणिक सत्राचा आठवडा उलटत असताना पाल्य दररोज पाठ्यपुस्तकांची मागणी करीत आहेत.पालकही पाल्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज बाजारात पाठ्यपुस्तकासाठी दुकानांमध्ये चकरा मारत आहेत. परंतु पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पाल्यांच्या नाराजीला पालकांना सामोरे जावे लागत आहे.पुस्तके उपलब्ध नाहीत याबाबत काहीही तक्रार आलेली नाही. पुस्तके उपलब्ध नसतील तर त्यासंदर्भात पाठ्यपुस्तक मंडळाशी बोलावे लागेल .- एन.के.देशमुख, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.