शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाच्या जीवनात नवी पहाट!

By admin | Updated: January 10, 2017 02:43 IST

माहेश्‍वरी मंडळाची सामाजिक बांधीलकी; १३८ दिव्यांगांना दिले कृत्रिम पाय .

खामगाव, दि. 0९- श्री माहेश्‍वरी मंडळ खामगावच्यावतीने सामाजिक बांधीलकी जपत १३८ दिव्यांगाना कृत्रिम पाय, कॅलिपर मोफत बसविण्यात आले. या शिबिराचा समारोप रविवारी स्थानिक दे.खि. मंगल कार्यालयात उत्साहा त पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक तर मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सीलचे माजी अध्यक्ष अँड.मोतीसिंह मोहता अकोला व अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी युवा संगठनाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दत्तप्रसाद तोतला, परळी वैजनाथ हे उपस्थित होते. यावेळी मंचावर समाजाचे अध्यक्ष प्रकाश राठी, महिला मंडळ अध्यक्षा निता चांडक, बहूबेटी मंडळ अध्यक्षा कु.हर्षा राठी, युवक मंडळाचे सचिव कौस्तुभ मोहता, महेश सेवा समितीचे संयोजक कृष्णकांत भट्टड, प्रकल्प अधिकारी विवेक मोहता सह प्रकल्प अधिकारी आनंद झंवर, अनुप टावरी तसेच विदर्भ प्रादेशिक माहेश्‍वरी युवा संगठनाचे प्रदेश मंत्री गोपाल तोष्णीवाल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. उपस्थितांनी माहेश्‍वरी मंडळाच्या या जनउपयोगी प्रकल्पासाठी मंडळाचे कौतुक केले. यावेळी १२0 दिव्यांगांना एक पाय तर ९ दिव्यांगांना दोन पाय असे एकुण १३८ कृत्रिम पाय/ कॅलीपर नि:शुल्क प्रदान करण्यात आले. मंगल कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांना पाय लावून चालविण्यात आले यावेळी दिव्यांग बंधुंच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले व त्यांनी आयोजकांचेआभार मानले. संचालन व आभार प्रदर्शन समाजाचे सचिव संजय सातल यांनी केले. सर्व दिव्यांग बंधुचे पायाचे माप ५ जानेवारी रोजी माहेश्‍वरी भवन खामगाव येथे घेण्यात आले व त्यांचे पाय अथवा कॅलीपर सिलीगुडी प.बंगाल येथून आलेल्या चमुने माहेश्‍वरी भवन येथेच बनविले. प्रकल्प यशस्वीतेकरीता माहेश्‍वरी महिला मंडळ, बहू बेटी मंडळ, युवक मंडळ, महेश सेवा समिती, महेश परिवार, खामगाव माहेश्‍वरी समाज बांधव, दे.खि. मंगल कार्यालय, संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव, विचार सेवा समिती जळगाव जामोद, जिल्ह्यातील विविध संस्था आदींचे सहकार्य लाभले अशी माहिती सचिव सातल यांनी दिली.