शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवे खातेदार शेतकरी पिककर्जापासून वंचित

By admin | Updated: May 21, 2017 20:13 IST

नाबार्डने मदत नाकारल्याने जिल्हा बँकेचा निर्णय

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नाबार्ड व राज्य शासनाने निधी देण्यास नकार दिल्यामुळे बुलडाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेने नवीन खातेदारांना पिककर्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवे खातेदार पिककर्जापासून वंचित राहणार आहेत. तर जुन्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरल्यास दहा टक्के वाढीव पिककर्ज देण्यात येणार आहे.खरीप हंगाम २०१७ -१८ ला लवकरच सुरूवात होणार असून, त्याकरिता शेतकऱ्यांना पिककर्जाच नितांत गरज आहे. त्यामुळे जिल्हा बँक पिककर्ज वाटपाला सोमवारपासून सुरूवात करणार आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देताना ८५ टक्के रक्कम राज्य बँक व नाबार्डकडून मिळते तर केवळ १५ टक्के रक्कम ही जिल्हा बँकेची असते. यावेळी राज्य बँक व नाबार्डने ८५ टक्के रक्कमदेण्यास नकार दिला. त्यामुळे नवीन खातेदारांना कर्ज न देता जुन्याच खातेदारांना कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेचे जिल्ह्यात १६ हजार चालू खातेदार असून, ५८ हजार १०८ खातेदार थकीत आहेत. १६ हजार चालू खातेदारांपैकी ८ हजार खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरून शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घेतला आहे. जिल्हा बँकेने वसूलीमध्ये वाढ केली असून, ३१ मार्च २०१६ मध्ये बँकचा एनपीए ८५.७६ टक्के होता. तर तो आता ६४.५८ टक्के झाला. एनपीएमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या ३१ मार्च २०१६ च्या नियमानुसार कोणत्याही बँकेला अस्तित्व टिकविण्याकरिता ७ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) असणे आवश्यक आहे. तर जिल्हा बँकेचे त्यावेळी ७.२८ टक्के होते. आता यामध्ये आरबीआयने बदल केला असून, बँकेचा अीआरएआर ९ टक्के असणे आवश्यक आहे. तर बुलडाणा जिल्हा बँकेचा सीआरएआर सध्या १०.८४ टक्के आहे.  त्यामुळे बँकेची स्थिती भक्कत असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.आजपासून पिक कर्जवाटप सुरूजिल्ह्यात बँकेच्यावतीने सोमवारपासून जुन्या खातेदारांना खरीप हंगाम २०१७ -  १८ करिता पिककर्ज वाटपाला सुरूवात करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षीचे कर्ज भरले त्यांना दहा टक्के वाढीव पिककर्ज मिळणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांनी मागील वर्षीचे कर्ज भरले नाही, त्यांनी कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.राज्य बँकेकडे निधीची मागणीजिल्हा बँकेच्यावतीने राज्य बँकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर राज्य बँकेने निधी दिला तर नवीन खातेदार शेतकऱ्यांना सूद्धा कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच्यावतीने वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र राज्य बँक कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कर्ज देण्याची सोपी पद्धतजिल्हा बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे प्रताडणा करण्यात येत नाही तर अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज दिल्या जाते. जिल्हा बँकेतून कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे गोळा करण्याची गरज नाही. तर शेतकऱ्यांनी केवळ सातबारा व डिक्लेरेशन दिल्यास शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर त्वरीत कर्ज मिळते.बँकेच्यावतीने मागील वर्षी घेतलेले पिककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी नवीन कर्ज दहा टक्क्यांनी वाढीव देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. बँकेतील १६ हजारपैकी ८ हजार शेतकऱ्यांनी हा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही मागील कर्ज भरून नवीन कर्ज घेण्याचा लाभ घ्यायला हवा. - डॉ. अशोक खरातसचिव, जिल्हा केंद्रिय सहकारी बँक, बुलडाणा