शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एनडीडीबी प्रकल्पावर जोर देण्याची गरज;  पहिल्या टप्प्यात जागृतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:42 IST

बुलडाणा : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) व मदर डेअरी फ्रुटस अ‍ॅन्ड वेजीटेबल लिमिटेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा या प्रकल्पात मागे पडलेला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली. प्रकल्प संचालकांनी बुलडाणा येथे अधिकार्यांची व कर्मचार्यांची भेट घेऊन प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला आहे.

बुलडाणा : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) व मदर डेअरी फ्रुटस अ‍ॅन्ड वेजीटेबल लिमिटेडच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी ३५२ गावांची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात प्रकल्पाची सुरूवात झाली आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्हा या प्रकल्पात मागे पडलेला आहे. त्यामुळे प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिक जोर देण्याची गरज आहे. दुधातील फॅट्स आणि एसएनएफचे प्रमाण योग्य राखण्यासाठी अर्थात दुधाची गुणवत्ता जपण्यासाठी उपरोक्त गाातील साडेतीन हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पशु संवर्धन विभागातील सात डॉक्टरांना गुजरातमधील आनंद प्रकल्पावर प्रशिक्षण देण्यात आले असून हे डॉक्टर आता जिल्ह्यातील सहा तालुक्यातील साडेतीन हजार नागरिकांना प्रशक्षण देणार आहेत. प्रत्येक गावातील किमान २० नागरिकांना यासंदर्भात प्रशिक्षण देऊन दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी जागृत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अगदी प्राथमिकस्तरावर गुरांची स्वच्छता व निगा राखण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून गोडीच निर्मूलनासाठी एनडीडीबी प्रकल्पातंर्गत तब्बल ५० शिबीरे घेण्यात आली आहे. यामध्ये गायींचे वंध्यत्व दूर करण्यासोबतच कृत्रिम रेतन, गुरांचे खच्चीकरण करण्यासंदर्भात यामध्ये प्रशिक्षण तर्था मार्गदर्शन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ६२, बुलडाणा तालुक्यातील ६५, खामगाव तालुक्यातील ७०, शेगाव तालक्यातील १५, मेहकर तालुक्यातील ५४ आणि मोताळा तालुक्यातील ८५ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा या गावात सुरू करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न होण्याची गरज आहे. प्रकल्प संचालकांचा वॉच जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रकल्प संचालकांनी प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले असून चार मे रोजी व्यक्तिश: प्रकल्प संचालकांनी बुलडाणा येथे अधिकार्यांची व कर्मचार्यांची भेट घेऊन प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिला आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचार्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुरांची काळजी घेण्याबाबतही त्यात बजावण्यात आले. गायवर्गीय पशुंच्या दुधातील फॅट्स ३.५ आणि एसएनएफ ८.५ ठेवण्यावर भर देण्यात आला असून त्या दृष्टीन पशुंची कशी निगा राखावी याचे मार्गदर्शनही प्रकल्प संचालकांनी या सर्व पृष्ठभूमीवर केले आहे.

वैरण विकास कार्यक्रमावर भर

उन्हाळ््यामध्ये दुग्धोत्पाद कमी होत असल्याच्या पृष्ठभूमीवर गुरांना चांगला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वैरण विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला असून त्यासाठी प्रकल्पातंर्गत ६१ लाख २० हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या प्रशिक्षणावरच सुमारे नऊ लाख रुपयांचा खर्च होत असून वंधत्व निवारण शिबीरासाठी दहा हजार रुपये तर गोचीड निर्मूलनासाठी १३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करू देण्यात देण्यात आला आहे. मदर डेअरी प्रकल्पातंर्गत सध्या मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि काही प्रमाणात मोताळा तालुकयात उपक्रम सुरू करण्यात आला असून ७२ गावात सध्या १२ हजार ५०० लिटर दुध संकलनाचेही काम सुरू झाल ेआहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा