शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

राष्ट्रवादीचे मोताळा नगरपंचायत समोर डफडे बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:26 PM

मोताळा : शहरवासीयांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांच्या नेतृत्वाखाली मोताळा नगरपंचायत कार्यलयासमोर सोमवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसने १६ एप्रिल रोजी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते.शहरातील समस्यांकडे लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

मोताळा : शहरवासीयांच्या विविध समस्या व अडचणी सोडवण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांच्या नेतृत्वाखाली मोताळा नगरपंचायत कार्यलयासमोर सोमवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.     मोताळा शहरातील विविध समस्या व अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने १६ एप्रिल रोजी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले होते. मोताळा नगरपंचायतला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी होत आला असून, कर व बांधकाम परवानगीचे दर तत्काळ वाढविण्यात आले. मात्र शहरवासीयांना त्या प्रमाणात सोयी सुविधा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद आहे. मोताळा येथील नाईक ले-आउट आणि सर्वेश्वर नगर जवळून जाणाºया नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे, कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करणे, शहरातील जि.प. शाळा नगरपंचायतमध्ये समाविष्ट करणे, शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करणे, आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी होत असल्याने बायपासची व्यवस्था करणे, शहरातील सर्व बांधकामे नियमित करणे, अल्पसंख्याकांसाठी घरकुलांची व्यवस्था करणे, अपंगांसाठी तीन टक्के निधी व राखीव घरकुलचा लाभ देणे, दलित वस्तीसाठी जास्तीत जास्त निधी आणून कामे करणे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी डफडे बजाव आंदोलन करून नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील समस्यांकडे लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.     या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेश शेळके, तालुकाध्यक्ष सुनील घाटे, जिल्हा सरचिटणीस डॉ. शरद काळे, जिल्हा सचिव सुनील कोल्हे, शहराध्यक्ष आसिफ कुरेशी, भिकन जमादार, रवि पाटील, संजय जवरे, महिला तालुकाध्यक्षा शीतल सरोजकार, लतिका गायकवाड, अहिरे ताई, बुलडाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर, सुनील फाटे, शंकर महाराज, शेख शाकिर, दिलीप गायकवाड, सुधाकर सुरडकर, भागवत शिकारे, शेख बादर, सलीम शाह, अमीर शाह, युसूफ शाह, सलिम खाटीक, दीपक सुरडकर, निलेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळा