शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

निसर्ग हीच जीवनातील संस्काराची पहीली पाठशाळा -  यादव तरटे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:02 PM

अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

 - अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कनिसर्गाची शाळा ही मुक्त शाळा आहे. जो पाहील तो शिकेलच.  जगायच कसे आणि वागायचे कसे? हे जंगलच माणसाला शिकविते. जंगल हेच जिविका देते. त्यामुळेच निसर्गच मनुष्याचा गुरू आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफ फाउंडेशन या संस्थेचे यादव तरटे पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

मानव-वन्यजीव संघर्ष याबाबत आपले मत काय?मानव वन्यजीव संघर्ष म्हणजे मानवाने स्वत:च्या अस्तित्वाला नामशेष करण्यासाठी स्वत:हून दिलेले आमंत्रण होय. निसर्गाशी असलेली सहजीवनाची मैत्री तोडून आपण त्यापासून दुरावलो. या निर्माण झालेल्या दरीने सहजीवन संपवलं आणि येथून मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू झाला. वनतस्करी, वन्यप्राणी शिकार, अतिक्रमण आणि विकास यातून नवा संघर्ष निर्माण झालाय. गत दहा वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात संघर्षाच्या लाखो घटना घडल्या आहेत. एकीकडे लाखोंच्या संख्येत वन्यप्राणी मरत आहेत तर हजारोंच्या संख्येत मानवाला प्राण गमवावा लागत आहे. 

व्याघ्र केंद्रीत पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय का?निश्चितच, व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन त्याच अर्थकारण हे अनेक अंगानी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.  अतिपर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतोय यावर आपल्या देशात अजून तरी फारसा विचार झालेला नाही.

वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान काय?  जंगलात केवळ वन्यजीवांमध्ये वाघ, सिंह आणि इतर वन्यप्राणीच नव्हे तर, इतरही भरपूर जैवविविधता आहे. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. ‘दिशा वाईल्ड’लाईफ फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून युवक आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणाºयांना गत १७ वर्षांपासून अविरत मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तसेच स्थानिक आदिवासी युवकांसाठी स्पर्धा परीक्षाबाबत मोफत मार्गदर्शन केल्या जाते. व्याघ आणि इतर शिकार विरोधी मोहिमेत असलेला सहभाग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण वाटतो. 

 पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात कधीपासून आलात?बालपणापासूनच पर्यावरण रक्षणासाठी आपला पुढाकार राहीला आहे. वन्यजीवांची आणि त्यांच्या जीवनाची आवड होतीच. मात्र, पदवीनंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरल्याने निसर्गाशी मैत्री अधिक घट्ट झाली. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या शिंदी या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने जंगल आणि वन्यप्राणी यांचा जवळून संबध आला. गेल्या १७ वर्षांपासून निसर्ग सेवेत कार्यरत आहे. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात म्हणजेच स्वसंवर्धनात आपला मुंगीचा वाटा देत असल्याचे मनस्वी समाधान  आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत