राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 17, 2014 00:06 IST2014-08-16T23:49:08+5:302014-08-17T00:06:24+5:30
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी बुलडाणातालुक्यातील नांद्राकोळीयेथील मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला.

राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी गुन्हा दाखल
बुलडाणा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी तालुक्यातील नांद्राकोळी येथील मुख्याध्यापकाविरुद्ध १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गंंत येणार्या नांद्राकोळी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तिरंगी राष्ट्रध्वज उलटा फडकला, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच या घटनेस जबाबदार असल्यानमुळे ग्रामस्थांनी मुख्याध्यापक जबाबदार असल्यामुळे मुख्याध्यापक भोजराज तोतरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नांद्राकोळी ग्रामपंचायत सदस्य रमेश काळवाघे आदी ग्रामस्थांनी केली होती. या तक्रारीवरून मुख्याध्यापक तोतरे विरुद्ध राष्ट्रीय ध्वज अवमान कायदा सन १९७१ च्या कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.