अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:57+5:302021-06-01T04:25:57+5:30

पिंपळगाव सराई (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावात ...

Naradham father's atrocities on a minor girl | अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार

अल्पवयीन मुलीवर नराधम बापाचा अत्याचार

पिंपळगाव सराई (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावात घडली़ अत्याचाराला विराेध केल्याने आराेपी बापाने मुलीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी पाेलिसांनी नराधम बापाला अटक केली असून न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली़

रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या बापाने २७ मे राेजी अत्याचार केला़ विराेध केला असता मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़ पीडित मुलीने ३० मे राेजी रायपूर पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली़ याप्रकरणी रायपूर पाेलिसांनी आराेपी बापाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़ पाेलिसांनी आराेपी बापास ३० मे राेजी रात्री अटक करून ३१ मे राेजी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली़ पीडित मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे़ पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे करीत आहेत़

Web Title: Naradham father's atrocities on a minor girl