नांदुरा येथे ट्रकने दुचाकीस्वार वृद्ध व्यक्तीला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 15:57 IST2021-05-31T15:56:49+5:302021-05-31T15:57:15+5:30
Accident News: निनाजी धोंडू कूयटे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

नांदुरा येथे ट्रकने दुचाकीस्वार वृद्ध व्यक्तीला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावरील खरेदी विक्री संघाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ मे २०२१ च्या दुपारी १२ वाजेदरम्यान घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे, की वडनेर भोलजी येथील निनाजी धोंडू कुयटे वय ६५ वर्षे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. २८ बि. जे. ९७०५ ने खरेदी विक्री संघाजवळून सेन्ट्रल बँकेकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या .जी.जे.१२ बी. डब्ल्यू.९०४५क्रमाांकच्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुुुचाकीस्वारच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे यांनी रुग्णवाहिकेसह हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी साठी पाठवला. यावेळी पवन चरखे, आनंद वावगे, सोनु चोपडे यांनी सुद्धा मदतकार्य केले.
या अपघाताप्रकरणी ट्रॉला चालक पिरमसिंह ज्ञानुसिंह रावत वय २८ वर्षे रा खेडादेवनारायण, तालुका ब्यावर,जिल्हा अजमेर, राजस्थान यास नांदुरा पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतले असून वृत्त लिहस्तोवर नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.