नांदुरा : ट्रक आणि टिप्परच्या धडकेत एक ठार

By admin | Published: April 29, 2018 01:19 AM2018-04-29T01:19:15+5:302018-04-29T01:19:15+5:30

नांदुरा : ट्रक आणि टिप्परच्या अमोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास  नांदुरा- मलकापूर मार्गावर घडली.

Nandura: A person killed by a truck and tipper | नांदुरा : ट्रक आणि टिप्परच्या धडकेत एक ठार

नांदुरा : ट्रक आणि टिप्परच्या धडकेत एक ठार

Next
ठळक मुद्दे ही घटना नांदुरा- मलकापूर मार्गावर घडली

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : ट्रक आणि टिप्परच्या अमोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास  नांदुरा- मलकापूर मार्गावर घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा- मलकापूर दरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून, २८ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान ट्रक क्र. एम एच १९- ५५६२ मलकापूरच्या दिशेने गॅस सिलिंडर घेऊन जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एम एच ०४ अ- ५७७४ हा टिप्पर येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने एकमेकांवर धडकली, यात टिप्परचालक पुरुषोत्तम दाणे (४०) रा. कोकलवाडी जागीच ठार झाला. 

Web Title: Nandura: A person killed by a truck and tipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.