The mystery of the murder of a woman in Ratnapur is revealed; Murder by husband | रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या

रत्नापूर येथील महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; पतीनेच केली हत्या

जानेफळ: शेतात निंंदण्यासाठी गेलेल्या महिलेचा रक्ताच्या थारोळ््यात आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले असून पतीनेच डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीस अटक केली आहे. दरम्यान जानेफळ पोलिसांनी १५ आॅगस्ट रोजी या प्रकरणी मृत महिलेचा पती संतोष गजानन डाखोरे विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मेहकर तालुक्यातील रत्नापूर येथील कल्पना संतोष डाखोरे (२५) ही महिला १४ आॅगस्ट रोजी आपल्या शेतात निंदण्यासाठी एकटीच गेली होती तर तिचा पती संतोष डाखोरे हा गावात काम असल्याने घरीच थांबला होता. दरम्यान दुपारून तो शेतात पोहोचल्यानंतर पत्नी शेतात रक्ताच्या थारोळ््यात पडली असल्याचे सांगतच तो गावात आला व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता. तपासात कल्पना डाखोरेंचा खून धारधार शस्त्राचा वार करून करण्यात आल्याचे तपासात समोर आले. दरम्यान या घटनेची माहिती मृत विवाहीतेच्या आई-वडिलांना तथा नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनीही रत्नापूर गाव गाठत थेट मृत कल्पनाचा पती संतोष गजानन डाखोरे यानेच तिचा खून केल्याचा आरोप केला. प्रकरणी १५ आॅगस्ट रोजी मृत कल्पनाचे वडील विनोद आनंदा खळे (रा. चौंडी (ता. पातुर, जि. अकोला) यांनी जानेफळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संतोष डाखोरे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली.

दहा वर्षापासून करत होता छळ

मृत कल्पनाचे वडील विनोद आनंदा खळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, संतोष डाखोरे हा तिचा गेल्या दहा वर्षापासून छळ करत होता. सोबतच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याने धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून पोलिसांनी संतोष गजानन डाखोरे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिलीप मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलिस करीत आहेत.

Web Title: The mystery of the murder of a woman in Ratnapur is revealed; Murder by husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.