शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

खामगावात निघाला मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:45 AM

खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरीयत प्रोटेक्शन कमिटीच्यावतीने सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. 

ठळक मुद्देतीन तलाक बिल रद्द करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरीयत प्रोटेक्शन कमिटीच्यावतीने सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. केंद्र शासनाने इस्लाम धर्मीयांच्या ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बद्दल मुस्लीम महिला ‘प्रोटेक्शन आॅफ राइट्स आॅन मॅरेज बिल २०१७’ लोकसभेत पारित केले आहे. सध्या राज्यसभेमध्ये ते प्रलंबित आहे. त्यामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ असून, संपूर्ण देशात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन होत आहे. भारतीय संविधानाने अनुच्छेद १९ अन्वये प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारानुसार लोकशाही पद्धतीने आणि शांततापूर्ण मार्गाने विरोध दर्शविण्यासाठी शरीयत प्रोटेक्शन कमिटी खामगाव महिला विभागातर्फे २८ मार्च रोजी एसडीओ यांना तलाक बिल २०१७ विरोधात निवेदन देण्यात आले. हे बिल मुस्लीम महिला आणि मुस्लीम मुलांच्या विरोधात असून, मुस्लीम समाज व भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. या बिलाचा आम्ही निषेध करतो, असे शरीयत प्रोटेक्शन कमिटीने म्हटले आहे. मुस्लीम महिलांना शरीयतने सर्व अधिकार दिलेले आहेत आणि इस्लामी शरीयतमध्ये आम्ही सुरक्षित आहोत, असे कमिटीने म्हटले आहे.महिलांचा मूक मोर्चा सकाळी १०.३० वाजता डॉ. जाकीर हुसैन फंक्शन हॉल न.प. प्राथ. शाळा क्रं.२ येथून मस्तान चौक, टिळक मैदान, मेन रोड, महावीर चौक, जनता बँक, सिटी पोलीस स्टेशन मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. महामहीम राष्ट्रपती यांच्या पार्लमेंटमध्ये देण्यात आलेल्या आपत्तीजनक व्यक्तव्यामधून मुस्लीम महिला हा शब्द काढण्यात यावा व भारत सरकार ही मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाच्या शरीयतमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये, या दोन मागण्यांचा समावेश आहे.

‘एसडीओं’कडून निवेदन घेण्यास विलंब!उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांना आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती. आंदोलनकर्त्या महिला १०.४५ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यावेळी ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे महिलांनी रोष व्यक्त केला. मंत्रालयाच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगून त्यांनी निवेदन घेण्यासाठी येण्याचे टाळले. यावेळी तहसीलदार सुनील पाटीलसुद्धा हजर होते; मात्र आम्हाला निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देणे आहे, असा आग्रह महिलांनी धरला. त्यामुळे प्रशासनाने उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांना माहिती दिली, त्यानंतर ३० मिनिटांनंतर ‘एसडीओ’ मुकेश चव्हाण हजर झाले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाDivorceघटस्फोटMuslimमुस्लीमagitationआंदोलन