काठीने मारहाण करून तरूणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:39 IST2020-09-18T18:39:42+5:302020-09-18T18:39:52+5:30
येथील ३५ वर्षीय तरुणाची काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना पळशी बु. येथे शुक्रवारी उघडकीस आली.

काठीने मारहाण करून तरूणाची हत्या
पळशी बु : - येथील ३५ वर्षीय तरुणाची काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना पळशी बु. येथे शुक्रवारी उघडकीस आली.
पळशी बु. येथे पळशी ते बाळापूर या रस्त्यातील खोल नाल्यात येथील उमेश रमेश मानकर याचा मृतदेह आढळला असल्याची तक्रार मृतकाचे वडील रमेश मोतीराम मानकर (वय ६०) यांनी पोलिसात दिली. १८ सप्टेंबर रोजी बिट जमादार बळीराम राठोड व राजेश गाडेकर सकाळी ११ वाजता घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला असता काठीने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसात व्यक्त केल्या जात आहे.