नागझरी शिवारात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:30 IST2021-04-20T12:29:54+5:302021-04-20T12:30:22+5:30

Murder News खून कोणी व कशासाठी केल्याचा तपास पोलीस करीत आहेत.   

Murder of one in Nagzari Area of Buldhana District | नागझरी शिवारात एकाचा खून

नागझरी शिवारात एकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क 
शेगाव  : एका ४७ वर्षीय व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह नागझरी शिवारातील रेल्वे स्टेशनच्या थोड्या अंतरावर रेल्वेमार्गावर टाकल्याचा प्रकार रविवारी सकाळी  उघडकीस आला. शेगाव रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
श्रीक्षेत्र नागझरी रेल्वे स्टेशनच्या नजीक खांब क्रमांक ५५५-४  जवळ रामधन नारायण दांदळे (वय ४७) रा. नागझरी यांचा मृतदेह आढळून आला. प्रारंभी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्याचे ठाणेदार सागर गोळे, पीएसआय पानपाटील, पोलीस नाईक विजय पल्हाडे व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताचे पाय दोरीने बांधलेले दिसून आले. त्यामुळे  रेल्वेने कटून मृत्यू झाल्याबाबत शंका उपस्थित झाली.  त्यादृष्टीने तपासचक्रे फिरवली. दरम्यान, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी. जी. काजवे यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृताची ओळख पटल्यानंतर चौकशीअंती शेगाव रेल्वे स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी मृताच्या नातेवाईकांना विचारपूस करण्यात आली. खून कोणी व कशासाठी केल्याचा तपास पोलीस करीत आहेत.   
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Murder of one in Nagzari Area of Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.