आसाेला शिवारात अनाेळखी युवतीची हत्या

By संदीप वानखेडे | Updated: January 23, 2024 19:33 IST2024-01-23T19:33:26+5:302024-01-23T19:33:51+5:30

चिखली तालुक्यातील आसाेला शिवारात अनाेळखी तरुणाची हत्या करून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना २३ जानेवारी राेजी उघडकीस आली.

Murder of an unknown girl in Asela Shivara | आसाेला शिवारात अनाेळखी युवतीची हत्या

आसाेला शिवारात अनाेळखी युवतीची हत्या

बुलढाणा: चिखली तालुक्यातील आसाेला शिवारात अनाेळखी तरुणाची हत्या करून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना २३ जानेवारी राेजी उघडकीस आली. या प्रकरणी अंढरा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चिखली ते अंचरवाडी रस्त्यावर आसाेला शिवारात एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच अंढेरा पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

घटनास्थळाला पाेलीस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पाेलीस अधीक्षक बी बी महामुने, उपविभागीय अधिकारी पाेलीस अधिकारी प्रदीप पाटील, अंढेराचे ठाणेदार विकास पाटील आदींनी भेट दिलीमृतक तरूणीचे वय १९ ते २५ च्या दरम्यान आहे. या तरुणीची हत्या करून ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा मृतदेह अर्धवटच जळाला या प्रकरणी पुढील तपास अंढेरा पेालीस करीत आहेत. 

Web Title: Murder of an unknown girl in Asela Shivara