दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला
By संदीप वानखेडे | Updated: February 10, 2024 16:40 IST2024-02-10T16:39:29+5:302024-02-10T16:40:32+5:30
भावालाही केली मारहाण, आराेपीस पाेलिसांनी केली अटक.

दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला
संदीप वानखडे, डाेणगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईवरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ९ फेब्रुवारी राेजी डाेणगाव येथे घडली. याप्रकरणी आराेपी मुलास पाेलिसांनी १० फेब्रुवारी राेजी अटक केली आहे़
डाेणगाव येथील आरोपी किरण प्रल्हाद भुतेकर याला दारू पिण्याचे व्यसन आहे. ९ फेब्रुवारी राेजी त्याने आई लक्ष्मीबाई भुतेकर यांना दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने किरण भुतेकर याने आईवर चाकूने वार केले. यामध्ये लक्ष्मीबाई भुतेकर गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहे. आईला का मारले, अशी विचारणा करणाऱ्या माधव भुतेकर यांनाही किरण भुतेकर याने मारहाण केली. याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी आराेपी किरण भुतेकर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आराेपीस पाेलिसांनी अटक केली आहे. तपास पाेलिस सतीश मुळे करीत आहेत. डोणगाव परिसरात एकाच आठवड्यात कोयत्याने व चाकूने हल्ला झाल्याच्या घटना घडल्याने डोणगाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे.